औरंगाबाद : साखरपुडा तीन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना चित्तेपिंपळगाव येथील शुभम बबनराव खोसे (24) या तरुण इंजिनिअरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटने विषयी नातेवाईक आणि पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत शुभम चे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेले होते.तो वीज वितरण कंपनीचे कंत्राट घेत असे. गावातील राहत्याघराच्या तळ मजल्यावर त्याचे कार्यालय होते.तेथूनच तो सर्व कामे करीत असे .काही दिवसांपूर्वीच त्याची नात्यातीलच मुली सोबत सोयरीक जमली होती. येत्या 20 मार्च रोजी शुभंमचा साखरपुडा होणार होता.त्यासाठी मागील चार ते पाच दिवसापासून घरच्यांची खरेदी सुरू होती.काल (सोमवारी) संध्याकाळी साखरपुड्याची अंगठी व इतर दागिने खरेदी केले. शुभमचा साखरपुडा असल्याने घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.रात्री त्याने घरच्यांसोबत जेवण केले व त्याच्या खोलीत झोपायला चाललो असे म्हणत तो खोलीत गेला.आज सकाळी बराच वेळ झाला तरी देखील तो झोपेतून उठला न्हवता.रोज सकाळीच उठणारा मुलगा आज का उठला नाही म्हणून घरच्यांनी त्यास आवाज दिला मात्र आतून कोणतेही प्रतिसाद मिळत नव्हते.बराचवेळ नंतर खिडकीच्या फटीतुन डोकावून पाहिले असता शुभम ने कापडाच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले.नातेवाईकांनी दरवाजा तोडत तातडीने त्यास फसावरून खाली उतरवित रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.काही दिवसावरच लग्न आलेले असताना नवीन आयुष्याची सुरुवात होण्यापूर्वीच शुभम ने आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय का घेतला हे दुपारपर्यंत स्पष्ठ होऊ शकले नाही.या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.